पिंपळपान
खूप दिवसांमधून माझ्या एका मैत्रिणी सोबत व्हाट्सअप्प वर गप्पा चालू होत्या. बोलता बोलता आमचा सहजच विषय निघाला आणि तिने खूप प्रयत्नपूर्वक जीवनाचा अर्थ सांगितला. माझ्या मनाला भावलं ते, कदाचित आम्ही जे बोलत होतो ते आम्हालाच जरा जास्त समजत असावं कारण आम्ही भूतकाळात अनुभवलेल्या परिस्थितीची माहिती आम्हाला होती. खरं सांगायचं तर तिच्या आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच तिने सोप्या शब्दांत मांडला, हे त्याचच थोडक्यात रूपांतरण …!
तिला छोट्या छोट्या गीष्टींमध्ये एन्जॉय करायची सवय आहे, या छोट्याश्या उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईलच. तर स्टोरी अशी चालू झाली की यंदाच्या दिवाळीत आम्ही एकदा तिच्या व माझ्या मुलांसोबत पिकनिकला दूर एका टेकडीवरील मंदिरावर गेलो.
तिथे गाडीतून उतरल्यावर मी माझे बूट घालत होतो तितक्याच वेळात तिथे तिला एक पिंपळाच वाळलेलं पान सापडलं, तिने त्या पानासोबत एक मस्त असा सेल्फी घेतला आणि परत सगळ्या तिच्या मुलांसोबत थोडस पटकन छानस फोटो सेशन केलं अगदी जास्तीत जास्त फक्त पाचच मिनिटांत. मग पुढे आम्ही टेकडीवर चालत गेलो मंदिरामध्ये लकीली प्रसादाच्या रूपात आम्हाला जेवायला मिळालं (भंडारा असावा बहुतेक) थोडंफार इकडे तिकडे फिरलो, एव्हाना अंधार व्हायला सुरुवात झाली आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो. अंधाऱ्या रात्री वापस येताना मस्त गाणे लावले, आजूबाजूला जन्गल असल्याने सर्वत्र निरव शांतता होती. खूपच छान वाटत होता तो रात्रीचा प्रवास अगदी मन प्रसन्न झाल वापस येताना.
घरी गेल्यावर तिने दुसऱ्या दिवशी तिच्या सेल्फीतला तो पिंपळाच्या पानाचा एक छानसा सेल्फी सोशल मीडिया वर पोस्ट केला त्यावर तिच्या एका मित्राने खूप कल्पक, अप्रतिम अशी एक सुंदर कविता लिहली, ती खरंच इतकी छान होती कि मलाही खूप आवडली ( तिच्या परमिशनने ती कविता इथे anonymously पोस्ट करत आहे)
मी तिला हि कविता पब्लिक करण्यासाठी सुचवलं, पण तिने नकार दिला… तिला वाटत होत तिचा पती काय म्हणेल, तिचे वडील काय म्हणतील… विनाकारण चौकशा वाढतील…वैगरे, वैगरे..! मग मी म्हणलं बरोबर आहे त्यांचंही,चार लोकांना ते भेटलेले असतात. माहिती असते किंवा समजते पण कोण कसा असू शकतो, किंवा ते पुढचा विचार करतात, पण एका दृष्टीने चांगलं आहे ते कारण People are not same all the time…!
तिला बोलता बोलता मीपण थोडासा विचारात पडलो. मला वाटत होत, मी पण जरासा जास्तच मॉडर्न आणि immatureअसल्या सारखा वागत आहे,आणि माझ्या अशा वागण्याने नक्कीच कुठं ना कुठं मी यात अडकणार. मी पुरुष असूनही मला ही बंधने आहेतच कि समाजाचे, वडिलांचे, त्यांच्या एवढी सामाजिक पत निर्माण करणे अवघड आहे पण आपल्यामुळे त्यांच्या मनाला कुठे ठेच लागली नाही पाहिजे…,पण कितीही झालं तरी Maturity च्या बंधनात अडकावंस वाटत नाही म्हणून मनाला वाटेल तसे वागतो, पुढे बघूया जे होईल ते होईल. हे सगळं मी तिला मी म्हणून दाखवलं, तिला सुद्धा ते पटलं अन यावर तिने खूपच छान शब्दात प्रतिक्रिया दिली…! तिची प्रतिक्रिया माझ्या मनाला इतकी भावली कि मी लगेच ठरवून टाकलं याचा एक छानसा ब्लॉग लिहायचा, तिच्या सांसारिक बंधनात अडकलेल्या मुक्त मनाचा हा एक प्रतिबिंब च असावा असे मला वाटते
(तिची प्रतिक्रिया जशास तशी तिच्या शब्दांमध्ये मांडतोय…!)
काही गोष्टी त्या त्या वयात एन्जॉय कराव्या आणि आपण ना थोडी कुणाच्या नजरा रोखू शकतो,तुम्ही पोस्ट करा न करा , वाईट नजरा कुठेही हेरणारच.
आणि असही मी जे काही अनुभवते किंवा करते ते माझ्या सोबत च्यानिही शिकावं ,अनुभवावं यासाठी असतं.
आणि आपण काही गैर करत नाही न एवढं कळलं ,आणि भान ठेवलं तर यात काहीही वाईट नाही उलट चांगली लोक,चांगले विचार आपल्याशी जोडले जातात आणि नवीन काहीतरी शिकायला ,करायला मिळत
Mature होणं म्हणजे वयानुसार जगण्याची कला शिकणं एवढंच काय ते मला कळत,
खर सांगायचं झालं तर आमच्या वडिलांनी केलेल्या चुकेतून मी हा धडा घेतलाय
ते कधीच स्वतः साठी जगले नाही एवढं तर कळलं मला ,आपला आनंद समाधान आपण मिळवायचा, नुसतं कमावणं म्हणजे जगणं नाही.
चांगलं झकपक भारी कपडे घालून राहणं म्हणजे हाऊस मौस नाही,
बँक बॅलन्स म्हणजे जगणं नाही,
सगळ्यांचं करत,स्वतः ला विसरण म्हणजे जगणं नाही.
तर आहे ते आयुष्य ,आनंद तुम्ही इतरांना ठेवत स्वतः ही किती आनंदी राहता आणि त्या मधून ही जेव्हा स्वतः साठी थोडस जगता ,हे खर जगणं.
आज आपण असू, उद्या नसू ही…
म्हणून आहे तो दिवस नविण्याने भरलेला असावा,त्यासाठी धडपड करावी,
नवनिर्मितीचा शोध घेत,आणि तो करत आयुष्य पुढे न्याव.
मी तर म्हणते, रोजचा स्वयंपाक ही,एन्जॉय करत करावा 😂
कुढत बसण्यात अर्थ नाही, अस करत मी past मध्ये बरच काही हरवलं
खरं सांगायचं तर माझ्याकडे शब्दच नव्हते तिला प्रतिक्रिया देण्यासाठी, मी तिला एवढंच बोलू शकलो
Comma च्या आधी स्पेस नसते, commachya नन्तर स्पेस पाहिजे😬👻🤣
पण खरंच, किती ते छान उच्च विचार मला खूपच भावले, तिने सध्या शब्दांत आयुष्याची व्यख्याच सांगितली होती असे व्यक्ती जीवनात असणं आणि अशा व्यक्तींसोबत मोठं होण्यात खरंच मजा आहे!
— Laxmikant R